Ambadas Danve | ठाकरेंशी बेईमानी करू नको, शिंदे गटात गेल्यास तुझा माझा संबंध संपला,आईची दानवेंना सक्त ताकीद

Ambadas Danve |लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा आज जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभा उमेदवारीवरुन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना यंदा छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची चर्चा आहे. त्यामुळे अंबादास दानवे नाराज आहेत. ते येत्या २-३ दिवसांत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान शिंदे गटात गेलास तर तुझा आणि माझा संबंध संपला. उद्धव ठाकरेंशी बेईमानी करू नकोस, अशी ताकीद अंबादास दानवेंना (Ambadas Danve) त्यांच्या आईने दिली आहे. यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अंबादास दानवे म्हणाले, “माझी आई आमच्या कुटुंबाची प्रमुख आहे. आमच्यापेक्षा जास्त संवेदनशील ती आहे. तिने मला अगोदरच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाशी बेईमानी करता कामा नये. माझ्या आईचं उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांची साथ सोडून शिंदे गटात गेलो तर तुझा आणि आमचा संबंध संपला”, अशी सक्त ताकीद आईने मला दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे