तामिळनाडूतील मंत्र्याला ईडीने ताब्यात घेताच रडू लागला, छातीतही आली कळ 

ED Arrested DMK Minister: मंगळवारी  तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील डीएमके सरकारमधील ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. या छाप्यात ईडीने मंगळवार-बुधवारी रात्री उशिरा सेंथिल यांना ताब्यात घेतले, मात्र त्यानंतर एक विचित्र घटना घडली जेव्हा ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री आपल्या तब्येतीची तक्रार करत रडू लागले.

यानंतर लगेचच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी तामिळनाडूचे वीज मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना सरकारी रुग्णालयात आणले. तेथे  त्यांना रुग्णालयात नेले जात असताना ते रडताना दिसले. दुसरीकडे त्यांच्या आजारपणाची माहिती मिळताच द्रमुकचे समर्थक रुग्णालयात जमा झाले आणि त्यांनी ईडीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररित्या हाताळू. घाबरू नका. त्याच वेळी, डीएमकेचे राज्यसभा खासदार आणि वकील एनआर एलांगो यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्याचा आरोप केला. तामिळनाडूच्या कायदामंत्र्यांनीही सेंथिलच्या अटकेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि सांगितले की सेंथिल बालाजीला विनाकारण टार्गेट आणि त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.