शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 विश्वचषक खेळण्याची किंमत मोजावी लागणार ?

कराची – पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका माजी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की शाहीन शाह आफ्रिदी पुढील 6-7 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहू शकतो. एवढेच नाही तर योग्य खबरदारी न घेतल्यास शाहीन आफ्रिदीचा पुढचा रस्ता धोक्यात येऊ शकतो, असे पीसीबीच्या माजी वैद्यकीय अधिकाऱ्याला वाटते. त्याची कारकीर्दही धोक्यात येऊ शकते.

टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या डावात झेल घेण्याच्या प्रयत्नात शाहीन आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली. . यामुळे शाहीनला मैदान सोडावे लागले. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही शाहीनची दुखापत हा सामन्याचा टर्निंग पॉइंट असल्याचे मान्य केले.