शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्व शोकसागरात; दिग्गजांनी ‘अशा’ केल्या भावना व्यक्त

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्नचा चेंडू खेळणे कोणालाही सोपे नव्हते. अशा या महान गोलंदाजाच्या जाण्यामुळे क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले आहे.