‘जेम्स लेनसारखा माणून उभा करून शरद पवारांनी वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिला’

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

जेम्स लेनसारखा (James Lane) माणून उभा करून शरद पवार यांनी वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला, असा गंभीर आरोप देखील राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर यावेळी केला आहे. शरद पवार यांनी जेन्स लेनवरून दहा ते पंधरा वर्षे राजकारण केले. त्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला तर मग तुमची केंद्रात सत्ता होती, त्यावेळी तुम्ही त्याला का फरफटत आणले नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

राजकीय स्वार्थासाठी वाद उकरून काढण्यात आले आहे.  पवार साहेबांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मी कोणतीही जात मानत आहे. अठरा पगड जातीमध्ये विष तुम्ही कालवले. हे विष आता शाळा- कॉलेजांमध्ये पोहचले आहे.  उदात्त विचार देणारा महाराष्ट्र हा  जातीमध्ये सडतोय. मी कोणत्याही जात मानत नाही. असं राज ठाकरे म्हणाले.