‘मी अजून पर्यंत एकही माणूस पवार साहेबांबद्दल खाजगी मध्ये चांगलं बोलताना बघितला नाही’

मुंबई – महाराष्ट्र दिनाचे औचित्य ( Justification of Maharashtra Day ) साधत काल मुंबईत झालेली भाजपची ( BJP )सभा असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची औरंगाबादेतील सभा या दोन्ही सभेतील नेत्यांच्या रडारवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार होते. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

दुसऱ्या बाजूला भाजपच्या सभेत देखील शरद पवारांवर टीका करण्यात आली. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर सुद्धा शरद पवार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केले असून त्यांनी सुद्धा शरद पवारांना लक्ष्य केले आहे.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) साहेब असू दे किंवा राजसाहेब ठाकरे असू दे सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आलाय. मी अजून पर्यंत एकही माणूस पवार साहेबांबद्दल खाजगी मध्ये चांगलं बोलताना बघितला नाही. आता तर लोकं उघड बोलू लागले. असं राणे यांनी म्हणत पवारांना लक्ष्य केले आहे.