संभाजी भिडेंच्या विरोधात कारवाई होत नसल्याने तुषार गांधी ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

असीम सरोदे सरोदे यांच्या मदतीने ही तक्रार दाखल केली जाणार आहे.

Tushar Gandhi – महात्मा गांधींचे परंतु तुषार गांधी हे आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide )यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये तक्रार दाखल करणार आहेत. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांसह इतर काही महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान करून त्यांचा अवमान केला होता. यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

यासंदर्भात तुषार गांधी यांनी याआधी पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ते आज संभाजी भिडे यांच्यासह डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल करणार आहेत.

एडवोकेट असीम सरोदे सरोदे यांच्या मदतीने ही तक्रार दाखल केली जाणार आहे. पुण्यातील गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अन्वर राजन, मेधा पुरव सामंत हे देखील तुषार गांधी यांच्यासोबत असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !