Chiplun मधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट-भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Chiplun | महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये (Chiplun) भाजप आणि शिवसेना (उबाठा)नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हा गोंधळ इतका वाढला की नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

पळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

का घडला हा वाद?
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली सभा झाली होती. या सभेत भास्कर जाधवांनी राणेंवर (Nilesh Rane) जहरी टीका केली होती. भास्कर जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो,. शिवाय भास्कर जाधवांनी नारायण राणेंचा नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा, असेही भास्कर जाधव म्हणाले होते.

नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, सकाळ संध्याकाळी टीव्ही चालू केला की हे घाणेरडं तोंडाचं समोर येतं. दुसरीकडे नेत्याच्या डोक्यावर पीक आलंय (नारायण राणेंचं विग). निलेश राणे म्हणजे चरशी असं भास्कर जाधव म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?