अजितदादांचे वर्चस्व वाढल्यानंतर आपले काय होणार याची भीती जयंत पाटलांना वाटतेय भीती ? 

Mumbai – ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Sharad Pawar Announced Retirement) देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. यानंतर आता राष्ट्रवादीत राजीमान्यांचे सत्र सुरू झाले आहे.  दरम्यान, दुसऱ्या बाजूला  पवारांच्या राजीनाम्याची प्रदेशाध्यक्ष असूनही जयंत पाटील यांनाच काही कल्पना नव्हती असे समोर आले आहे. मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर जयंत पाटील यांच्यासाठी तो मोठा धक्का होता. जयंत पाटील यांना शरद पवार व्यक्त यांचा मोठाच आधार आहे. निवृत्तीच्या घोषणेमुळे तो आधारच राहिला नाही तर मात्र स्थिती बिकटही होऊ शकते..

दरम्यान, सध्या राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन गट आहेत. मात्र, शरद पवारांच्या अध्यक्षपदावर असण्यामुळे गटबाजी दिसून येत नव्हती मात्र आता पवारच बाजूला झाले तर अजित पवारांचे वर्चस्व वाढल्यानंतर आपली पक्षात किती किंमत राहील, आणि आपले काय होईल याची भीती जयंत पाटील यांना वाटत असल्याचे  राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.