Shikhar Dhawan | शिखर धवन करणार होता महिला क्रिकेटर मिताली राजसोबत लग्न? स्व:तच सांगितले

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनची (Shikhar Dhawan) क्रिकेट कारकीर्द आता अधोगतीकडे वाटचाल करत आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही आणि आता त्याच्या भारतीय संघात परतण्याच्या आशाही फार कमी आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये शिखर धवन पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवत होता, परंतु मोसमाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. सध्या क्रिकेटपासून दूर असलेला शिखर धवन त्याच्या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये धवनने स्वतःशी संबंधित एका अफवेबद्दल खुलासा केला.

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) सांगितले की, त्याने एकदा एक अफवा ऐकली होती की तो भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत लग्न करत आहे. धवनने सांगितले की ही त्याच्याबद्दलची एक विचित्र अफवा होती. महिला क्रिकेटची दिग्गज खेळाडू मिताली राज हिने निवृत्तीनंतर समालोचन आणि मेंटरशिपमध्ये दुसरी इनिंग सुरू केली आहे. ती महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आहे.

या संभाषणादरम्यान धवनने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि भारतीय स्टार ऋषभ पंत याचेही कौतुक केले, ज्याने 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात शानदार पुनरागमन केले आहे. धवन म्हणाला, ‘अपघातानंतर त्याने ज्या प्रकारे त्याचे पुनर्वसन आणि दुखापतींना हाताळले त्याचे मला कौतुक करायचे आहे. त्यांनी दाखवलेली सकारात्मकता आणि ताकद अप्रतिम आहे. तो परत आला, आयपीएल खेळला आणि भारतीय संघात सामील झाला हे अविश्वसनीय आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे.’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप