“महिला आरक्षण विधेयकाला आमचा पाठिंबा, पण…”, सोनिया गांधींनी मांडली काँग्रेसची भूमिका

हे विधेयक पारित होण्याचा आम्हाला आनंदच आहे. पण याचबरोबर एक चिंतादेखील आहे.

Nari Shakti Vandan Bill – आज सकाळी नवीन संसद भवनात विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली. महिला आरक्षणविषयक नारीशक्ती वंदन विधेयकावरील चर्चेला सदनात प्रारंभ झाला. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी (Congress leader Sonia Gandhi) यांनी प्रथम या विधेयकाबाबत आपलं मत मांडणारं भाषण केलं. हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून कार्यान्वित करावं आणि महिलांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा असं आग्रही प्रतिपादन करतानाच सरकारनं जातीनिहाय जनगणनेचा निर्णयही घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सोनिया गांधी म्हणाल्या, माझ्या आयुष्यातला हा मोठा मार्मिक क्षण आहे. देशात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांची भागीदारी निश्चित करणारं संविधान संशोधन विधेयक माझे जीवनसाथी आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडलं होतं. परंतु, राज्यसभेत ते सात मतांनी पडलं. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने ते विधेयक पारित केलं. त्यामुळे आज आपल्या देशात स्थानिक पातळीवर निवडून आलेल्या १५ लाख महिला आहेत. त्यामुळे राजीव गांधी यांचं अर्ध स्वप्न पूर्ण झालं आहे. आता हे विधेयक पारित झाल्यावर त्यांचं स्वप्न पूर्ण होईल.

सोनिया गांधी म्हणाल्या काँग्रेस पक्ष या विधेयकाचं समर्थन करतो. हे विधेयक पारित होण्याचा आम्हाला आनंदच आहे. पण याचबरोबर एक चिंतादेखील आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातल्या स्त्रिया त्यांच्या राजकीय जबाबदारीची वाट पाहत आहेत. या विधेयकानंतरही त्यांना आणखी काही वर्ष वाट पाहावी लागेल. देशातील स्त्रियांना आणखी किती वर्षं वाट पाहावी लागणार आहे? दोन वर्षं? चार वर्षं? सहा वर्षं? की आठ वर्षं? भारतातल्या स्त्रियांबरोबर होणारा हा व्यवहार योग्य आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केले.

महत्त्वाच्या बातम्या-

Virat Kohali : देशभक्त विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गायकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, जाणून घ्या नेमके कारण …

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास