Umesh Patil | पुढची पिढी वाचवायची असेल तर डान्सबार, पब आणि ऑर्केस्ट्रा बार शंभर टक्के बंद झाले पाहिजेत

Umesh Patil | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणानंतर राज्य सरकार रात्री उशिरापर्यंत पब चालू राहू नये म्हणून आक्रमक झाले आहे. दरम्यान पुढची पिढी आपल्याला वाचवायची असेल तर डान्स बार, पब आणि ऑर्केस्ट्रा बार शंभर टक्के बंद झाले पाहिजेत अशी वैयक्तिक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी राज्यातील डान्स बार बंद केले होते. त्यापध्दतीने असा कायदा करा की डान्स बार चालवणारा कोर्टातून सुटता कामा नये असेही उमेश पाटील म्हणाले.

आजची तरुण पिढी उध्वस्त होत चालली आहे. या डान्स बार आणि पबमुळे मध्यमवर्गीयांना श्रीमंतांसारखे पैसे उडवण्याचे वेगळे आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे हे डान्सबार, पब बंद करून साधी हॉटेल सुरू करा असे आवाहनही उमेश पाटील यांनी सरकारला केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप