विधीमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर

Mumbai – आज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सत्ताधारी आंदोलन करत असताना विरोधक मुद्दाम त्यांच्या मध्ये गेले ज्यामुळे दोन्ही गटामध्ये मोठा वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. जशास तसं उत्तर देऊ, ते जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा आम्ही मध्ये कधी आलो नाही. विरोधकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.