अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे ‘या’ १३ आमदारांची वाढली धाकधूक ?

Mumbai – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. (NCP split) राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली..(Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister.)

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटाला हादरा बसणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, आपल्या समर्थक आमदारांचे संख्याबळ वाढविण्यावर अजित पवार यांचा भर असणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रभाव करून निवडून आलेल्या  विद्यमान तेरा आमदारांची धाकधूक वाढली आहे अशी चर्चा आहे.

या आमदारांमध्ये संदीपान भुमरे, शंभूराजे देसाई,तानाजी सावंत, उदय सामंत, महेश शिंदे,चिमणराव पाटील,लताबाई सोनवणे,रमेश बोरनारे,सुहास कांदे,मंगेश कुडाळकर,महेंद्र थोरवे,योगेश कदम,प्रकाश आबीटकर (Sandipan Bhumre, Shambhuraje Desai, Tanaji Sawant, Uday Samant, Mahesh Shinde, Chimanrao Patil, Latabai Sonwane, Ramesh Bornare, Suhas Kande, Mangesh Kudalkar, Mahendra Thorve, Yogesh Kadam, Prakash Abitkar) या आमदारांची धाकधूक वाढली आहे.