औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंना काळे झेंडे दाखवण्याचा ‘या’ संघटनेचा इशारा

पुणे – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या (Loudspeakr) मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.  न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे  पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) राज ठाकरे यांनी येत्या 5 जून रोजी मी आयोध्या दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  तसेच महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी संभाजी नगर मध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एक मे रोजी औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत आम्ही काळे झेंडे (Black Flag) दाखविणार असल्याचा इशारा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून (Social Democratic Party of India) देण्यात आला आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेत अशोकराव जाधव,अजहर तांबोळी आणि ताज सिद्दीकी यांनी भूमिका स्पष्ट केली.राज ठाकरे यांच्या पाठीमागून भाजपा (BJP)ही खेळी खेळत असून राज ठाकरे हे भाजपाचे अनाधिकृत भोंगा आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलूच नये. पण आम्ही या विरोधात सनदशीर मार्गाने (In a legal way) उत्तर देऊ असं यावेळी सांगण्यात आले.

मुस्लिम समाजाला (Muslim community) आजपर्यंत प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजऱ्यात बघितले आहे, हे अनेक घटनांमधून समोर आले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा काढले नाही तर आम्ही तिथे हनुमान चालीसा लावून असे विधान केले. त्याही पुढे जाऊन आम्हाला तीन तारखेपर्यंत मुदत दिली आहे. हे आम्हाला मान्य नसून राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहेत. राज ठाकरे यांच्या पाठीमागून भाजपा ही खेळी खेळत असून राज ठाकरे हे भाजपाचे अनाधिकृत भोंगा आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलूच नये. पण आम्ही या विरोधात सनदशीर मार्गाने उत्तर देऊ, असं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने सांगितलंय.