शिंदे – ठाकरे वादात आता नरेंद्र मोदी यांनीच मध्यस्थी करावी; दिपाली सय्यद यांची मागणी 

मुंबई – शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde ) वेगळी वाट स्वीकारली आणि महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसमोरचं आव्हान आता उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) कसं पेलणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकनाथ शिंदे गट भाजपामध्ये न जाता अजूनही आम्ही शिवसेनेतच असून उद्धव ठाकरेच आमचे पक्षप्रमुख असल्याचं ठामपणे सांगत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेमकं पुढे काय होणार आहे? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे.आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून मा. नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे. असं सय्यद यांनी म्हटले आहे.