‘माझ्यासाठी तू सर्वकाही आहेस’, द्विशतकवीर यशस्वी जैस्वालच्या प्रेमात पडली चाहती?

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत (IND vs ENG) सलग दुसरे द्विशतक झळकावले आहे. हैदराबाद कसोटीत यशस्वीला फारशा धावा करता आल्या नाहीत. यानंतर विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये यशस्वीची बॅट जोरात गर्जत होती. सलग दुहेरी शतके झळकावून त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची बँड वाजवली.

वास्तविक, भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने 231 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. या द्विशतकाने त्याने संपूर्ण जगाला आपली क्षमता दाखवून दिली. चौथ्या दिवसाच्या खेळात यशस्वीने इंग्लंडचे (IND vs ENG) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यांना झोडपून काढले.

जैस्वालच्या खेळीला दाद देताना त्याच्या एका चाहतीने पोस्ट केली, ज्याला राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीने दाद दिली. तिने म्हटले की, कोण आहे यशस्वी जैस्वाल? अंध व्यक्तींसाठी जैस्वाल हा प्रकाश आहे. भुकेल्यांसाठी जैस्वाल भाकरी आहे. आजारी लोकांना बरे करण्याचे तो औषध आहे. एकाकी पडलेल्यांसाठी जैस्वाल कंपनी आहे. दुःखी लोकांसाठी तो आनंदाची आशा आहे. कैद्यासांठी जैस्वाल हे एक स्वातंत्र्य आहे. माझ्यासाठी जैस्वाल सर्वकाही आहे, असे चाहतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया