Rashmi Barve | मी घाबरणार नाही, मी अबला नाही;  रश्मी बर्वे भाजपवर बरसल्या

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचं जात प्रमाणपत्र, जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागानं जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीनं बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीनं दिला आहे.

जात पडताळणी समितीच्या (Rashmi Barve Caste Validity Certificate) या निर्णायनंतर आता निवडणूक आयोगाने देखील त्यांचा अर्ज बाद ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अर्ज बाद झाला असला तरी बर्वे माघार घ्यायला तयार नाहीत.त्या निवडणूक आयोग आणि जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागणार आहेत.

निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवल्यानंतर रश्मी बर्वे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे. मी यांना घाबरणार नाही.. मी अबला नाही. महिला दुर्गेचे रुप असते. मी महिषासुराचा नाश करेन. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे तुम्ही कोम. हे बेटी बचाव, बेटी पढावच्या गप्पा करतात. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे ते कोण आहेत, असा हल्लाबोलही बर्वे यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल