जाणून घ्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला काय मिळणार?

मुंबई : शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर शपथ घेतली, पण  11 जुलैला या संबंधित महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यानंतरच खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतरच होईल हे म्हणूनच सांगितलं जातंय.

गृह खात्यासह महत्वाची खाती भाजपकडे

गृह विभाग, अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास, ग्रामविकास ही खाती भाजपकडे असतील.

शिंदे गटाकडे 13 ते 14 मंत्रिपद

एकनाथ शिंदे गटाकडे 13 ते 14 मंत्रिपद असतील.  यात नगरविकास, उद्योग, कृषी, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण आदी खाती मिळण्याची शक्यता आहे.महसूल आणि आरोग्य विभाग कोणाकडे असेल याबद्दल अद्यापही चर्चा सुरू आहे.