‘अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा केला’

Pawar vs Pawar: राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर काका अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध पुतण्या रोहित पवार (Rohit Pawar) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय नागरिक आणि पवार कुटुंबीयांना आवडलेला नाही. भाजपला जे जमलं नाही ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा करुन केलं आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) हे बोलत असताना म्हणाले की, मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर वेगळं काहीतरी मिळालं असतं. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील निर्णय घेण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर होती. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले, असं असताना त्यांना आणखी काय हवं होतं? पदच हवं होतं ना. भाजपकडे जाण्याचं कारण पदच आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत असं रोहित पवार यांनी म्हटले.

अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचं घ्या त्यांच्यावर काय- काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे. त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती होती. जेलमध्ये जायला लागू नये म्हणून ते भाजपसोबत गेले. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ८४ वर्षाचे शरद पवार लढत आहेत. मग आपण पळून जाऊन कसे चालेल. मराठी माणूस हा कधी पळून जात नाही. हे आपण ऐकलं आणि पाहिलं आहे. आम्ही देखील जेलला घाबरत नाही. कारण आम्ही काही चुकीचं केलंच नाही. असं रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया