राहुल गांधीनी सावरकरांवर टीका केली, चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाला झापलं…

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. यात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी विधान केलं. भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली.

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.

दरम्यान,  भारतमातेच्या थोर सुपुत्राचा आणि एका मराठी महापुरुषाचा राहुल गांधींनी अपमान केल्याचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. कॉंग्रेसच्या मांडीला मंदी लाऊन बसलेल्या उद्धव ठाकरे गटाला यानिमित्ताने भाज पनेत्या चित्रा वाघ यांनी फैलावर घेतले आहे. याबाबत बोलताना  चित्रा वाघ म्हणाल्या, कोणीतरी सांगितलेला इतिहास ऐकायचा आणी काहीही बोलायचं ही कुठली वैचारिक प्रगल्भता..म्हणे सावरकरांनी कोणा दुसऱ्याकडून स्वतःवर पुस्तक लिहून घेतलं हा रागांचा बेसूर झालेला नवा राग का ?आश्यर्य तर या गोष्टीचंही वाटतं कि सावरकरांचा सतत अपमान करणाऱ्या सोबत मा.बाळासाहेबांचे वारसदार फिरतात तरी कसे ?? वारसदार हे कुटुंबात जन्म झाल्यानं होत नाही तर विचारांनी असतात, हेच खरं. ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीला पुजायला हवं, त्यांची याच महाराष्ट्रात अवहेलना करण्याची हिम्मत कोणी करतंय ? रक्त सळसळत नाही का ? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे गटाला केला आहे.