‘टुकडे टुकडे गँगच्या ‘शर्जील’ला अभय आणि …’; श्वेता महालेंनी राऊतांना झापलं  

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे भाजप (bjp) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, कमाल आहे ! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का ? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आता राऊत यांना भाजप आमदार श्वेता महाले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. टुकडे टुकडे गँगच्या ‘शर्जील’ला अभय, देशद्रोह्यांशी संबंधित ‘नवाब’ना संरक्षण, भारतरत्न कै. लतादीदी, सचिन तेंडूलकर, अमिताभ यांची गुप्त चौकशी…आणि भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या मा. देवेंद्र फडणवीसजींची चौकशी! अराजकतेकडे वेगाने वाटचाल. वा रे वा ठाकरे सरकार!! असं म्हणत महाले यांनी राऊत यांना चांगलच झापलं आहे.