मोठी बातमी | Sharad Mohol प्रकरणात पोलिसांना मिळाला अत्यंत महत्त्वाचा पुरावा

पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी 2024 रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या झाली. मोहोळ (Sharad Mohol) याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळ्या झाडल्या होत्या.

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागाला आहे. शरद मोहोळ हत्याप्रकरणात मुख्य सूत्रधारांसह अन्य आरोपींच्या मोबाईलच्या विश्लेषणातून पोलिसांच्या हाती सहा ऑडिओ क्लिप लागल्या आहेत. त्यामध्ये या गुन्ह्याच्या कटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. यातून या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता असल्याचं तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी म्हटलं आहे.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या 19 हजार 827 ऑडिओ क्लीप आणि कॉल रेकॉर्डिंग मिळाले असून, त्यापैकी 12 हजार 320 क्लीपचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये सहा महत्त्वाच्या ऑडिओ क्लीप्सचा तपास सुरू आहे. न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी