Sikkim Rainfall | मुसळधार पावसामुळे दरड कोसळली १२०० पर्यटक अडकले

सिक्किममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Sikkim Rainfall) आणि दरड कोसळल्याने अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून, मंत्री शेरिंग भुतिया स्वतः रस्ते आणि हवाई मार्गाने पर्यटकांच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी हेमकुमार छेत्री यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग तसंच लोकांच्या मदतीने स्थानिक बचाव आणि पुनर्विकास काम सुरू आहे.

मुख्यमंत्री प्रेसिंग तमांग यांनी मेल्लीबाजारला भेट देऊन पुरामुळे झालेल्या (Sikkim Rainfall) नुकसानाचा आढावा घेतला. तसंच पाटबंधारे विभागाशी प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चाही केली. पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी पूरनियंत्रण भिंत बांधणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितलं आहे. सिक्किममधले रस्ते आणि पूल विभाग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यादरम्या काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत, राष्ट्रीय महामार्ग दहावर येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला तिकडे पंजाब, हरयाणा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून या राज्यांना लाल बावटा जारी केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशालाही केशरी बावटा देण्यात आला आहे. काल दिल्लीत ४४ पूर्णांक ६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप