श्रावण महिन्यात खेकडे खाणारी Spruha Joshi झाली ट्रोल; नेटकरी भडकले 

“खेकडा खाताना फॅन्सी वागू नये…तो हातानेच खायचा”

Spruha Joshi ate crabs- सध्या प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. उदाहरण द्यायचं झालं तर अभिनेत्री स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi).   स्पृहा  ही  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण ती देखील आता प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

नुकतीच अभिनेत्रीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यानिमित्ताने तिने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. तिची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून नेटकरी काहीसे नाराज झाले आहेत.

अभिनेता विनोद गायकरसह स्पृहा जोशी एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये स्पृहा, “खेकडा कसा खावा?” याचं प्रशिक्षण देताना दिसत आहे. “खेकडा खाताना फॅन्सी वागू नये…तो हातानेच खायचा” असं अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

मात्र, श्रावण महिन्यात तिने खेकडा खाल्ल्याने नेटकरी काहीसे नाराज झाल्याचं कमेंट्स सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. अनेकांनी तिला ती ब्राह्मण असल्याची देखील आठवण करून दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

महायुती सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्या – हसन मुश्रीफ

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

Virat Kohli ला आलीय इतिहास घडवण्याची संधी; ‘या’ विश्वविक्रमाच्या तो आहे अगदी जवळ

Pradhanmantri Kisan Yojana : ८१५९५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार केंद्राचे पैसे