आप नेते राघव चड्ढांनी परिणीती चोप्रासोबतच्या नात्यावर सोडले मौन! म्हणाले, “परिणीतीबद्दल…”

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि राजकीय नेत्यांची अफेअर काही नवी नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लव्ह लाईफची सध्या खूप चर्चा आहे, कारण तिचं नाव आम आदमी पार्टीच्या खासदाराशी जोडलं गेलं आहे. हा खासदार राघव चड्ढा (AAP MP Raghav Chadha) असून त्यांचे दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांना एकत्र पाहून सोशल मीडियावर ते डिनर डेटसाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्याची चर्चा आहे. हे फोटो समोर येताच, सोशल मीडिया वापरकर्ते असा अंदाज लावत आहेत की परिणीती आणि राघव चड्ढा यांचे अफेअर सुरू आहे.

दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाच जेव्हा राघव चड्ढाला परिणीती चोप्रासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी फार मनोरंजक उत्तर दिले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसदेतून बाहेर आल्यानंतर राघव त्यांच्या कारकडे जात असताना एका पत्रकाराने त्यांना अभिनेत्रीसोबतच्या नात्याबद्दल विचारले. परिणीती चोप्रासोबतच्या त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंवर राघव यांना टिप्पणी करण्यास सांगण्यात आले. यावेळी स्मितहास्य करत ते म्हणाले की, तुम्ही मला राजकारणाचे प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका.