Sinhagad Road Traffic : सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

Sinhagad Road Traffic : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदलाबाबतचे तात्पुरते आदेश पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जारी केले आहे.यानुसार गोयलगंगा चौकाकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना गोयलगंगा चौकापासून व सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून गोयलगंगा चौकाकडे जाताना सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय चौकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूस ३० मीटर पर्यंत नो पार्किंग झोन तयार करण्यात येत आहे.

गोयलगंगा चौकाकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी. बँक ते अमृतगंगा सोसायटी गेट क्रमांक ४ (शोरबा हॉटेल) पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला तर एच.डी.एफ.सी. बँकेपासून ते सोबा ऑप्टिमा सोसायटीचे गेट (प्रेमाचा चहा शॉप) पर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूस फक्त दुचाकी पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

गोयलगंगा चौकाकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय चौकाकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूस दुभाजक संपल्यानंतर मनपा प्रस्तावित नाट्यगृह ते अतिथी हॉटेलपर्यंत फक्त चारचाकी वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १९ नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’