रोहित सराफ आणि मिथिला पालकरबरोबर स्केचर्सच्या कम्युनिटी गोल चॅलेंजने पुण्याला तुफान प्रतिसाद

Rohit Sharaf And Mithila Palkar: द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी™ स्केचर्सने कम्युनिटी गोल चॅलेंज इव्हेंटसह (Community Goal Challenge Event) पुणे पॅव्हेलियॉन (Pune Pavilion) येथे आपले नवीनतम भव्य दालन सुरू करण्याची घोषणा केली. तंदुरुस्ती आणि त्या जोडीने मदत यांची सांगड घालण्याची परंपरा पुढे चालू ठेवत, स्केचर्सने प्रख्यात बॉलीवूड अभिनेते रोहित सराफ आणि मिथिला पालकर यांना पुणे पॅव्हेलियॉनमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. इंडियन स्पोर्ट्स रीव्होल्युशन या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून १,००० किलोमीटरचे सामूहिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असताना तीन दिवसांच्या या कार्यक्रमाने पुणे समुदायाला ट्रेडमिल आव्हानात एकत्र केले.

या कार्यक्रमाबाबत बोलताना स्केचर्स एशिया प्रा.लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल विरा म्हणाले, “दिल्ली आणि चंदीगडमधील आमच्या मागील कम्युनिटी गोल चॅलेंजेसच्या उत्तुंग यशानंतर, हा अनोखा उपक्रम पुण्यात आणताना आम्ही खूपच उत्सुक होतो. आमचे उद्दिष्ट केवळ आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देणे हेच नव्हते तर इंडियन स्पोर्ट्स रिव्होल्यूशन या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या जीवनावर अर्थपूर्ण प्रभाव पाडणे हेही होते. आम्हाला खात्री होती की पुणे या प्रसंगी पुढे येईल आणि आमचे उद्दिष्ट पार करण्यात आम्हाला मदत करेल.”

मिथिला पालकरने तिची उत्कंठा व्यक्त केली आणि म्हणाली,”पुण्यातील स्केचर्स कम्युनिटी गोल चॅलेंजने एका आनंददायी प्रवासाचे आश्वासन दिले आहे आणि येथे येऊन मी खूप भारावून गेले आहे. एका चांगल्या कारणासाठी एकत्र येणाऱ्या आपल्या समाजाच्या सामर्थ्याचा साक्षीदार होणे हे अतुलनीय आहे. आम्ही फक्त तंदुरुस्त राहण्यासाठी चालत नाही; तर तरूण प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि आपल्या देशातील तळागाळाच्या पातळीवरील खेळांना प्रोत्साहन देण्याकरता असलेल्या उल्लेखनीय कार्याला पाठिंबा देण्यासाठी चालत आहोत. फिटनेस आणि त्या माध्यमातून मदत यांचा एकत्रितपणे समावेश असलेल्या या कार्यक्रमाचा मला एक भाग होता आले याचा मला अभिमान आहे.”

रोहित सराफने आपल्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, “आज पुण्यातील स्केचर्स वॉकथॉन कार्यक्रमात तुम्हा सर्वांसमवेत असताना मला खरोकरच खूप आनंद झाला. एका विलक्षण कार्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो तो उत्साह आणि उर्जा बघणे खूप भारावून टाकणारे आहे. हे माझे दुसरे कम्युनिटी चॅलेंज आहे; पहिला कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झाला. या उपक्रमाचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.”

कम्युनिटी गोल चॅलेंजचे हे सत्र इंडियन स्पोर्ट्स रीव्होल्युशनला शूजचे १०० जोड देण्यासाठी समर्पित होते. पुण्यातील स्वयंसेवी संस्था भारतात तळागाळातील पातळीवर खेळांना प्रोत्साहन देते. ते क्रीडा शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तरुण खेळाडूंना सक्षम बनवण्यासाठी आणि निरोगी आणि अधिक सक्रिय राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्न करतात.

या लॉन्चसह, स्केचर्स पॅव्हेलियॉन हे पुणे शहरातील १४ स्केचर्स स्टोअर्सचा एक भाग बनले आहे. ते परफॉर्मन्स पासून लाइफस्टाइल श्रेणींमध्ये पसरलेल्या पादत्राणे आणि पोशाखांची विस्तृत श्रेणी सादर करतात.

स्केचर्स कम्युनिटी गोल चॅलेंजने उल्लेखनीय यश मिळविले आहे, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले आहे आणि स्थानिक समुदायांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. भारतभर ४०० हून अधिक स्टोअरच्या नेटवर्कसह, स्केचर्स आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि ते ज्यांना आपले घर मानतात अशा समाजाला परतफेड करण्यासाठी समर्पित आहे.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole

Previous Post

मॅथवर्क्स तर्फे ऑटोमोटिव्ह कॉन्फरन्स 2023 चे पुण्यात आयोजन

Next Post
इनड्राइव तर्फे ग्राहकांच्यासेवेसाठी ''सेट योर प्राइस'' उपक्रम

Indrive : इनड्राइव तर्फे ग्राहकांच्यासेवेसाठी ”सेट योर प्राइस” उपक्रम

Related Posts
आशिष मिश्रा

आंदोलकांना चिरडण्याचा आरोप असलेल्या आशिष मिश्राचा जामीन रद्द होण्याची शक्यता

लखनौ – केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा…
Read More

‘इर्सल’ चा ट्रेलर म्हणतोय ‘इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय’

पुणे – निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या  ‘इर्सल’ या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर मोठ्या…
Read More
Sunil Tatkare | बहुजन, कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम केले

Sunil Tatkare | बहुजन, कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम केले

Sunil Tatkare | माझ्या बहुजन… कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम या मतदारसंघात केल्याचे सांगत केंद्रसरकारच्या…
Read More