रतन टाटा,एलोन मस्क यांच्यासह जगातील श्रीमंत व्यक्तींनी करीयरची  सुरुवात कशी केली ? 

मुंबई – आजपर्यंत तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल वाचले आणि ऐकले असेल. पण हे यशस्वी अब्जाधीश आधी काय करायचे आणि ते श्रीमंत कसे झाले हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला नसेल. आज आम्ही तुम्हाला या नायकांची सुरुवातीची कहाणी सांगणार आहोत.

एलोन मस्क

सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क (एलॉन मस्क)  हे व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता आहेत. पण टेस्लाचे सीईओ मस्क यांनी ‘व्हिडिओ गेम सेलर’ म्हणून करिअरची सुरुवात केली. ते  कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे व्हिडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीत काम करत  होते. मस्क हे अतिशय शिक्षित व्यक्ती आहेत, त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’मधून  एनर्जी फिजिक्स मध्ये पीएचडी केली आहे. आज एलोन मस्कची एकूण संपत्ती २०२.१ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे.

जेफ बेझोस

कॉमर्स कंपनी Amazon चे जगातील नंबर एकचे मालक आणि सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी मॅकडोनाल्ड (McDonald’s) येथे बर्गर बनवून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण 27 वर्षांपूर्वी, कोणाला माहित होते की हा बर्गर बनवणारा एक दिवस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल. आज जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती 191.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे.

 स्टीव्ह जॉब्स

ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात असेंबली लाईन वर्कर’ असायचे. ते लहानपणापासूनच खूप सर्जनशील होते आणि ते स्वतः व्हिडिओ गेम  बनवायचे. स्टीव्हला व्हिडीओ गेम मेकर ‘अटारी’मध्ये पहिली नोकरी मिळाली होती. आज भले स्टीव्ह या जगात नसेल, पण त्यांच्या  नवनवीन शोधांमुळे ते अनेक दशके   लोकांच्या हृदयावर राज्य करत राहील.

बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना लहानपणापासूनच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये खूप रस होता.ते  शाळेपासूनच कोडिंग करत असत. बिल गेट्स वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी TRW कंपनीत संगणक प्रोग्रामर म्हणून रुजू झाले. या दरम्यान त्यांचा पहिला पगार होता $20,000 (रु. 15.10 लाख). बिल गेट्स हे त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि दानशूरपणामुळे आज लाखो लोकांसाठी प्रेरणा आहेत. आज बिल गेट्सची एकूण संपत्ती १३१ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे.

 मार्क झुकरबर्ग

फेसबुकचा संस्थापक ;मार्क झुकेरबर्गची कहाणीही खूप रंजक आहे. ही व्यक्ती एक दिवस संपूर्ण जगाला जोडण्याचे आणि जवळ आणण्याचे काम करेल, याची कल्पनाही कोणी स्वप्नातही केली नसेल. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या झुकेरबर्गने शालेय शिक्षणादरम्यान सिनॅप्स मीडिया प्लेयर नावाचा म्युझिक प्लेअर बनवला. आज मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती US$ 118.1 बिलियन च्या जवळपास आहे.

रतन टाटा

रतन टाटा हे भारतातील सर्वात श्रीमंत घराण्यातील आहेत, पण आपल्या मेहनतीने त्यांनी ‘टाटा ग्रुप’ला ते ज्या स्थानावर नेले आहेत, ते कौतुकास्पद आहे. रतन टाटा थेट कंपनीचे मालक बनले नाहीत, तर त्यांनी ‘टाटा स्टील कंपनी’मध्ये पर्यवेक्षक म्हणून करिअरची सुरुवात केली. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे त्यांच्या दानशूरपणासाठीही ओळखले जातात. आज रतन टाटांची एकूण संपत्ती 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे

जॅक मा

जॅक मा अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत, पण आज ते आशियातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. स्थानिक विद्यापीठात इंग्रजी शिकवून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली, या काळात त्यांना दरमहा $15 पगार मिळत असे. आज जॅक मा यांची एकूण संपत्ती ४८.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे.