… म्हणून रोहित शर्माचा IPL पूर्वी होणार होम ग्राऊंडवर सत्कार 

मुंबई – भारत श्रीलंका यांच्यातील मर्यादित 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या मलिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. लखनौ इथे झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करत भारतानं 2 गडी बाद 199 धावा करत श्रीलंकेपुढे 200 धावांचं लक्ष्य ठेवलं; मात्र त्यांना 20 षटकांत 6 गडी बाद 137 धावाच करता आल्या.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) रोहितचासन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.   गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रोहित सोबत एमसीएने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, फलंदाज सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांचाही सन्मान केला जाईल.या शिवाय अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी यालाही एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.”