काही जणांचा राग केव्हाही कुठेही कसाही बाहेर पडू शकतो; राष्ट्रवादीच्या नेत्याची पडळकर-खोत यांना वार्निंग 

  पुणे – मागील काही दिवसांपासून भाजपाचे  विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar)व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) हे शरद पवार (sharad pawar) यांच्यावर चांगलेच प्रहार करतांना दिसत त्यामुळे पडळकर, खोत विरुद्ध राष्ट्रवादी असे शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. खोत यांनी  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. “शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावण्याचे काम केल्यानं त्यांचे आडनाव आगलावे करा”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.

ही टीका राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावर, राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते विकास लवांडे (vikas lavaande) यांनी चांगलच सुनावले आहे. पडळकर खोत यांच्याबाबत राष्ट्रवादीच्या युवकांमध्ये कधी नव्हे इतका सुप्त राग व संताप मला सध्या जाणवतो आहे. अनेकजण आपल्या भावना खाजगीत व्यक्त करत आहेत. त्यांच्या सहनशीलतेला नक्कीच मर्यादा आहेत. असे ते म्हणाले.

“ज्येष्ठ नेते मा.शरदराव पवार साहेबांविषयी व्यक्तीद्वेषा पोटी किंवा भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी खोत व पडळकर यांचेकडून वारंवार खालच्या पातळीवर होणारी टीका टिप्पणी पक्षातील सर्वजण सहन करतील असे वाटत नाही. सर्वांची सहनशक्ती एकसारखी नसते.कदाचित काही जणांचा राग केव्हाही कुठेही कसाही बाहेर पडू शकतो.” असा धमकीवजा इशारा लवांडे यांनी पडळकर अणि खोत यांना दिला आहे. पुढे, विकास लवांडे म्हणाले ;”मा.पवार साहेब लोकनेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बाहेर सुद्धा विविध क्षेत्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याची भाजपला नक्कीच जाणीव आहे” ; असंही ते म्हणाले.