South actress | व्हेटिंलेटरवर आहे ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री, लढतेय जीवन-मरणाची लढाई

South actress arundhati nair on ventilator | दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती नायर (Arundhati Nair) जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढत आहे. केरळमधील कोवलममध्ये बाईक अपघातात अभिनेत्री सापडली होती. अरुंधतीचा 14 मार्च रोजी अपघात झाला होता, त्यानंतर तिच्यावर तिरुवनंतपुरम (South actress) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरुंधतीची बहीण आरती नायर हिने या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की, तिच्या डोक्याला खोलवर दुखापत झाली आहे, त्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे.

पोस्ट शेअर केल्यानंतर आरतीने काय लिहिले?
आरतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या बहिणीच्या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला. आरतीने पोस्ट शेअर केली, ज्यात लिहिले आहे की, ‘मला तामिळनाडूच्या वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रकाशित झालेल्या बातम्यांबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली. माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला होता हे खरे आहे. ती गंभीर जखमी झाली असून तिरुअनंतपुरममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असून जीवनाशी लढा देत आहे.

बहिण म्हणाली प्रार्थना करा
अपघातानंतर अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अरुंधतीच्या बहिणीने ही पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना बहिणीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. आरतीच्या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘आमच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘देव तिला लवकर बरे करो.’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी