IPL 2024 | सीएसकेच्या अडचणी संपता संपेना, आता आणखी एक धाकड वेगवान गोलंदाजाला झाली दुखापत

IPL 2024 | आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी सीएसकेला एकामागून एक धक्के बसत आहेत. सर्वप्रथम चेन्नईचा घातक फलंदाज डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे बाहेर पडला. त्यानंतर सीएसकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना (Mathisha Pathirana) जखमी झाला आणि 4-5 आठवडे आयपीएलमधून बाहेर राहणार आहे. यानंतर संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी, सीएसकेचा आणखी एक वेगवान गोलंदाज जखमी होऊन मैदानाबाहेर गेला. आता सीएसके कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार, हाही चिंतेचा विषय आहे.

खेळाडू मैदानात पडला
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सीएसकेला मोठा धक्का बसला. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना खेळाडू अचानक खेळपट्टीवर पडला. खेळाडूला तात्काळ स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले. ही घटना 48व्या षटकात घडली. या षटकापूर्वी रहमानने 9 षटके टाकली होती, ज्यामध्ये त्याने 2 बळीही घेतले होते. यादरम्यान, जेव्हा तो 42 वे षटक टाकण्यासाठी आला, तेव्हाही या खेळाडूला अडचणींचा सामना करावा लागला. या वेळी तो खेळपट्टीवर पडला, तरीही त्याने कसे तरी स्वतःवर नियंत्रण ठेवले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

माहीची टीम तणावात
मुस्तफिजुर रहमानला आधीच अडचणींचा सामना करावा लागत होता, पण तरीही तो 48 व्या षटकात गोलंदाजी करायला आला. यादरम्यान तो पुन्हा एकदा खेळपट्टीवर पडला. यावेळी त्याला आणखी अडचणींचा सामना करावा लागला. त्याला पुन्हा-पुन्हा पेटके येण्याची समस्या भेडसावत होती. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर झोपवून बाहेर काढण्यात आले. यानंतर उर्वरित षटके सौम्या सरकारने टाकली. यामुळे केवळ बांगलादेशचा तणाव वाढला नाही तर चेन्नई सुपर किंग्जही यामुळे तणावात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी