स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य

Jharkhand Crime: झारखंडमधील दुमका येथे एका परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार (Spanish Girl Raped In Jharkhand) झाल्याची घटना समोर आली आहे. येथे एका स्पॅनिश महिलेने हंसदिहा पोलीस स्टेशन परिसरात काल रात्री काही लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पोलीस महिलेची वैद्यकीय तपासणी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. या संदर्भात दुमका जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की, पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पतीसोबत बाईक टूरवर भारतात आली होती. शुक्रवारी रात्री कुरुमहाट येथील तंबूत झोपलेल्या असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

तंबूत घुसून परदेशी महिलेसोबत सामूहिक बलात्कार
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी स्पेनमधून टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. स्पेनमधून दुचाकीवरून ते पाकिस्तानला पोहोचले. यानंतर ते पाकिस्तानातून बांगलादेशमार्गे भारतात आले. झारखंडला पोहोचल्यावर ते दुमका जिल्ह्यातील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावात तंबूत थांबले होते. यादरम्यान 8-10 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. झारखंडमधील पीडित विदेशी महिला तिच्या पतीसोबत नेपाळला जात होती. महिलेने सांगितले की, सामूहिक बलात्कारासोबतच आरोपींनी महिलेला मारहाणही केली.

पोलिस कारवाई करत आहेत
महिलेने पोलिसांना सांगितले की, ती तिच्या पतीसोबत दुमकामार्गे भागलपूरला जात होती. पण रात्र असल्याने त्यांनी निर्जन ठिकाणी तंबू ठोकला. यावेळी ते झोपला असताना काही लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि तिला पुन्हा मारहाण केली. या घटनेची तक्रार केल्यानंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सरैय्याहाट सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सध्या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’