Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Sambhaji Bhide Car Attack: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची गाड अडवत त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेल्याची बातमी समोर येत आहे. नाशिकमधील मनमाड येथे भिमसैनिकांनी रात्री साडेअकराच्या सुमारास संभाजी भिडेंची गाडी अडवत त्यांना काळे झेंडा दाखवले. यावेळी आक्रमक झालेल्या काही भिमसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचाही समजत आहे. याप्रकरणी मनमाड पोलिसांत भीमसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी भिडे हे येवला येथे कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते येवल्यातून रात्री उशीरा गाडीने मनमाड मार्गे धुळ्याला निघाले होते. यादरम्यान मालेगाव चौफुलीवर काही भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरत त्यांची गाडी अडवली आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. तर काहींनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. संबधित घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तातडीने मनमाडमध्ये दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गोंधळ घालणाऱ्या भीमसैनिकांना ताब्यात घेतलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल