Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’

Muralidhar Mohol – लोकसभेची धामधूम सुरू झाली असल्याचे चित्र पुणे शहरात दिसत आहे. भाजप आणि कॉँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आपापली दावेदारी केली आहे. भाजपकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, शिवाजीराव मानकर, भाजपचे माजी सचिव सुनील देवधर उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. आपण इच्छुक असल्याचे या सर्वांनी उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे. पण पुणे लोकसभेसाठीचे प्रबळ दावेदार असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी आता पहिल्यांदाच माध्यमांशी पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) या विषयावर संवाद साधला आहे. त्यांनी आजवर कधीही प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना आपण लोकसभेसाठी दावेदार असल्याचे म्हटले नाही अथवा या सर्व घडामोडींदरम्यान ते कधीही प्रसार माध्यमांसमोर आले नाही. ते महापालिकेमध्ये आले असताना त्यांना प्रसार माध्यमांनी घेरले आणि ते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला. त्यासंदर्भात मोहोळ यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले आणि त्यांना ते लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे का? असे विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षाने माझ्यावर पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे. त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे पुण्याची जागा जिंकली पाहिजे आणि ती पुन्हा एकदा कायम ठेवली पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत. निश्चितपणे ही जागा आम्ही जिंकणार आहोत. एक निवडणूक प्रमुख म्हणून माझी ती प्राथमिक जबाबदारी आहे आणि या निवडणुकीची तयारीही सुरु आहे.

त्यानंतरही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तुम्ही स्वत: इच्छुक आहात का? हा प्रश्न लावून धरला तेव्हा, “संघटनेची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी कार्यकर्ता आहे. कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही? पक्षांनी संधी दिली, तर कोण नाही म्हणतो? अशी भूमिका त्यांनी मांडली.

ते पुढे असेही म्हणाले की, “पण आमच्याकडे एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. कोण इच्छुक आहे याच्यावर उमेदवार ठरत नसतो. तर पक्ष सांगतो त्यावेळेला मात्र पक्षाचा जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जो उमेदवार असेल तो असेल, उद्या पक्ष मला म्हटला तर मी असेल”.

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल