गंभीरने मैदानावर श्रीशांतसाठी वापरले अपशब्द; म्हणाला, ‘तू फिक्सर आहेस..’

Sreesanth On Gautam Gambhir: भारताचे दोन माजी क्रिकेटपटू श्रीशांत आणि गौतम गंभीर (Sreesanth-Gambhir Fight) यांच्यातील वाद थांबत नाही आहे. आता श्रीशांतने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि थेट सामन्यादरम्यान गंभीरने मैदानाच्या मध्यभागी काय म्हटले होते ते सांगितले, ज्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले होते. श्रीशांतच्या म्हणण्यानुसार, गंभीरने त्याला ‘तू फिक्सर है… तू फिक्सर है’ म्हणत त्याला शिवीगाळ केली होती. श्रीशांत म्हणाला की, मी गंभीरला काहीही बोललो नाही आणि फक्त तो का रागावला आहे असे विचारत होता.

श्रीशांत म्हणाला- गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लेजेंड्स लीग क्रिकेट (legends league cricket) सामन्यादरम्यान गौतम गंभीरने श्रीशांतला जे काही सांगितले होते त्यावर श्रीशांत अखेर उघडपणे बोलला. श्रीशांतने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘अनेक चॅनल मला कॉल करत आहेत आणि माझ्याकडून मैदानावर काय घडले ते जाणून घ्यायचे आहे. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी पीआर (जनसंपर्क) मध्ये खूप पैसे खर्च करते आणि चुकीच्या गोष्टी पसरवते. म्हणूनच मी थेट येत आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. मला प्रत्येक वृत्तवाहिनीवर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करायची नाही.’

गंभीरवर गंभीर आरोप
श्रीशांत म्हणाला- आम्हाला माहित आहे की तो (गंभीर) किती शक्तिशाली आहे आणि तो पीआरवर किती खर्च करू शकतो. मी एक सामान्य माणूस आहे, ज्याने माझ्या कुटुंबासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी एकट्याने लढा दिला आहे. त्यामध्ये तुम्हा सर्वांचेही सहकार्य लाभले आहे. जगासमोर लाईव्ह टीव्हीवर तो मला फिक्सर फिक्सर म्हणत राहिला. मी त्याला एकही वाईट शब्द बोललो नाही. मी त्याच्यासाठी कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरला नाही. मी फक्त त्याला विचारले – तू मला काय सांगत आहेस? आणि मी हसत होतो कारण तो मला पुन्हा पुन्हा फिक्सर म्हणत होता. तसेच अपशब्द वापरत होता.’

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम