आशिया चषकाआधी सापांचा धोका वाढला, मैदानावर खेळाडू थोडक्यात बचावला – Video

श्रीलंकेत आशिया कप (Asia Cup 2023) सामन्यादरम्यान सापांचा धोका आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. आशिया चषक 30 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये 6 देशांचे खेळाडू मैदानात उतरणार आहेत. पण, त्यापूर्वीच तेथील क्रिकेट मैदानावर सापांनी दहशत निर्माण केली आहे. तेथे सुरू असलेल्या लंका प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान 2-3वेळा साप मैदानावर आले आहेत, ज्यामध्ये लीग खेळणारे खेळाडू अगदी थोडक्यात बचावताना दिसले आहेत. आता प्रश्न असा आहे की, सामन्यादरम्यान खेळाडूंना साप येऊ नयेत यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्ड काय प्रयत्न करत आहे?

श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या टी-20 लीगमध्ये कधी भर मैदानात साप रेंगाळताना दिसले आहेत तर कधी संघाच्या डगआऊटजवळ दिसले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे साप अगदी किरकोळ साप नसून तो दिसायला मोठा आणि विषारी आहे. इतकेच नव्हे तर एकदा एक खेळाडू सापापासून बालंबाल बचावतो.

त्यामुळे आशिया चषकाच्या सामन्यांदरम्यान सापांना मैदानात येण्यापासून रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय. लंका प्रीमियर लीगमध्ये सापांची जेवढी प्रकरणे समोर आली आहेत, त्यावरून श्रीलंका क्रिकेट बोर्डाला त्याची फारशी चिंता नसल्याचे दिसते. त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. कारण, तसे केले असते तर साप बाहेर आले नसते आणि मैदानातून पळून गेले असते. आता हीच स्थिती आशिया चषकाच्या सामन्यांदरम्यान राहिल्यास श्रीलंका क्रिकेट बोर्डावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.