पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभत असलेल्या पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Pune metro : पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात (Pune Metro Schedule) बदल करण्यात आला आहे. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते दिवाणी न्यायालय या दोन्ही मार्गांवर पुणे मेट्रोची प्रवासी सेवा आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहील. दरम्यान पुण्यातील मेट्रो स्थानकावर काल पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्वातंत्र्य दिनाच्या सुटीची पर्वणी साधत पुणेकरांनी मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 11 वाजेपर्यंत सुमारे 1 लाख 23 हजार पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला.

पुणे मेट्रोची वारंवारता पुढीलप्रमाणे असेल

वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी ६ ते ८ – दर १५ मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ – दर १० मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी ४ – दर १५ मिनिटांनी
दुपारी ४ ते रात्री ८ – दर १० मिनिटांनी
रात्री ८ ते १० – दर १५ मिनिटांनी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग
सकाळी ७ ते ८ – दर १५ मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ – दर १० मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी ४ – दर १५ मिनिटांनी
दुपारी ४ ते रात्री ८ – दर १० मिनिटांनी
रात्री ८ ते १० – दर १५ मिनिटांनी