स्टार्ट-अप कंपन्याना कंपनी सेक्रेटरीच्या मदतीची गरज – रणजीतसिंह नाईक निंबाळकर

स्टार्ट-अप कंपन्याना कंपनी सेक्रेटरीच्या मदतीची गरज - रणजीतसिंह नाईक निंबाळकर

Pune – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजच्या २३ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नुकतेच लोणावळा येथे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. आशिष मोहन सेक्रेटरी आयसीएसआय तसेच इतर कौन्सिल सदस्य यावेळी उपस्थित होते. दोन दिवसीय कॉन्फरन्सची थीम कंपनी ‘सेक्रेटरी- या प्रिफर्ड प्रोफेशनल’ अशी होती.अनेक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरींना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यामध्ये विविध विषयांवर व्यावसायिक चर्चा घडवणे व त्यांना त्यांच्या कामाची जबाबदारी लक्षात आणून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

कंपनी सचिवांसोबतच्या त्यांच्या सहवासाची आठवण करून देताना, प्रमुख पाहुणे   रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “कंपनी सचिवांच्या सल्ल्याशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय कंपन्या काम करू शकणार नाहीत. कॉर्पोरेट क्षेत्र विशेषत: स्टार्ट-अप्सना त्यांच्या मदतीची गरज आहे. सुशासनाची खात्री करून आणि गुंतवणूकदारांची आशा आणि विश्वास कायम ठेवून ते भारतीय अर्थव्यवस्था पुढे नेणारे आहेत.”

कंपनी सचिवांचे तीन कार्यक्षेत्र म्हणून रोजगार, सराव आणि शैक्षणिक यांवर प्रकाश टाकत, सीएस देवेंद्र व्ही देशपांडे, अध्यक्ष, आयसीएसआय, यांनी आयसीएसआय ने घेतलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. त्यांनी कंपनी सेक्रेटरीसाठी ऍट्रिब्युशन व मेडिएशन सारख्या क्षेत्रात असलेल्या संधीबद्दल देखील चर्चा केली. सुमारे १,४०० प्रतिनिधी, ३५० व्यक्तीशः आणि १,००० हून अधिक ऑनलाईन, या परिषदेला उपस्थित होते. ज्यांनी दोन दिवसांत अनेक अभ्यासपूर्ण सत्रांवर चर्चा करणार्या प्रख्यात वक्ते आणि व्यावसायिकांची मते जाणून घेतली..

आय.सी.एस.आय बद्दल

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ही भारतातील कंपनी सेक्रेटरींच्या व्यवसायाचे नियमन आणि विकास करण्यासाठी संसदेच्या कायद्यानुसार, म्हणजे कंपनी सेक्रेटरीज कायदा, १९८० अंतर्गत स्थापन केलेली एक प्रमुख व्यावसायिक संस्था आहे.हे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. संस्था, एक सक्रिय संस्था असल्याने, कंपनी सेक्रेटरीज कोर्सच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि उच्च-गुणवत्तेच्या शिक्षणावर आणि CS सदस्यांसाठी सर्वोत्तम दर्जाच्या मानकांवर लक्ष केंद्रित करते. संस्थेचे ६७,००० हून अधिक सदस्य आणि सुमारे २.५ लाख विद्यार्थी आहेत.

Previous Post
jayant patil

सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही ;सरकार अजूनही अस्तित्वात, कामकाज सुरू – जयंत पाटील 

Next Post
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण संरक्षण काढलं; एकनाथ शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण संरक्षण काढलं; एकनाथ शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

Related Posts
महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी :- नाना पटोले

महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी :- नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात…
Read More
Supriya Sule | इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही

Supriya Sule | इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)…
Read More
Ravindra Chavan

दोन वर्षे रखडलेल्या प्रश्नाला मिळाली १५ दिवसात गती

मुंबई – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते धामणदेवी…
Read More