प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मुंबईतील लोकसभा प्रवासावर, चार दिवसांमध्ये मुंबईतील सुपर वॉरियरशी संवाद

Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ अंतर्गत चार दिवसांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रवासाला दोन जानेवारीला सुरुवात करत आहेत.

मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ रोजी ते मुंबई शहरातील तीन लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

या प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

• सकाळी ११. ०० वाजता भाजपा मुंबई कार्यालय वसंत स्मृती दादर (पू) येथे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अनुशक्ती नगर व धारवी या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

• दुपारी ३.०० भायखाळा (पू) येथील १०, युनिट १, दादोजी कोंडदेव मार्ग येथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवडी, वरळी, व भायखळा या तीन विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

• सायंकाळी ६.०० वा, अंधेरी येथील युनिव्हर्सल बँक्वेट हॉल येथे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी या तीन विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिर्यस व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, मुंबई दक्षिण लोकसभा समन्वयक व राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा समन्वयक आ. प्रसाद लाड, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा समन्वयक आ. अमित साटम, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुंबई दक्षिण-मध्य भाजपा जिल्हा सरचिटणीस नीरज उभारे, मुंबई दक्षीण जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, मुंबई उत्तर पश्चिम भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, सुपर वॉरियर्स सहप्रमुख सुहास अडिवरेवर व राजेश सिंग यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत अतिक्रमणे हटवली जाणार; सात दिवसांचा अल्टीमेट्म

राज्यात 45 च्या वर खासदार तुम्हाला महायुतीचे दिसतील; महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे,नवनीत राणा यांनी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान