मी ब्राह्मणाला मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो – रावसाहेब दानवे 

जालना –  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.  मी ब्राह्मणाला(Brahmin)  या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. ३ मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीनिमित्त(Parashuram Jayanti)  जालन्यात बोलताना केले आहे.

आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत जालना शहरात ब्राम्हण समाजाच्या लोकांना एका पेक्षा जास्त नगरसेवकपदे द्या अशी मागणी ब्राह्मण समाजातील सुनील किंगावकर (Sunil Kingavkar)  यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केली होती. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणांना प्रतिनिधित्व द्या. एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडणून द्या असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. पण ही विनंती मला लागू होत नाही. कारण मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेला पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो, असे रावसाहेब दानवे म्हणाले.