राज्यात 45 च्या वर खासदार तुम्हाला महायुतीचे दिसतील; महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जोमाने तयारीला लागले असून जागावाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. महायुतीने एका बाजूला राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे.

या पार्श्वभूमीवर 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहे. 45 हून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी आहे. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केला आहे. आज मुंबईत तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, जिल्हा, तालुका आणि बूथ पातळीवर मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचे जाहीर मेळावे होणार आहय घटक पक्षाचे नेते देखील या मेळाव्याला हजर असतील. मोदींजींच्या नेतृत्वात राज्यात महायुतीला एक मोठे यश मिळेल. 45 प्लस जागा या राज्यात जिकणार आहोत. 51 टक्के मते मिळणार आहेत. आमच्या तीनही पक्षांनी महायुती मजबूत करण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष प्रवेशाचे रोजच निमंत्रण येत आहे.महायुतीमध्ये अनेक जण यायला इच्छुक आहेत. राज्यातले 45 च्या वर खासदार तुम्हाला महायुतीचे दिसतील.

महत्वाच्या बातम्या-

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे,नवनीत राणा यांनी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश