मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत आहे – मिटकरी 

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी खळबळजनक ट्वीट्स केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Nawab Malik and Anil Deshmukh) यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

“माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. सोबतच सिंचन घोटाळा प्रकरणाची (Irrigation Scam Case) पुन्हा चौकशी झाली पाहिजे, 2019 मध्ये परमबीर सिंग यांनी चौकशी बंद केली होती!, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे.

याशिवाय मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचाी पोलखोल करणार आहे त्यात देशातील आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील मालमत्ता, विविध पोर्टफोलिओमध्ये मंत्री म्हणून केलेला भ्रष्टाचार ,कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता यादी!, अस ट्विट कंबोज यांनी केलंय.

दरम्यान, कंबोज यांच्या या ट्वीट नंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,  मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा कुणी तत्ववेत्ता किंवा भविष्यकार नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार, काहीतरी जुने घोटाळे काढणार आणि महाराष्ट्राचे वातावरण खराब करणार, असा आरोप अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचे देखील त्यांनी  म्हटले.

मोहित कंबोज यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना माहिती कोण देतंय याची चौकशी करणे गरजेचे आहे. ईडी कार्यालयात कंबोज बसत असतील त्यांची चौकशी करावी अशी मागणी मिटकरी यांनी केली. मोहित कंबोज यांना ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती कशी मिळते याची चौकशी करावी अशी मागणीदेखील मिटकरी यांनी केली.