ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली, यशामागे ‘या’ व्यक्तीचा राहिला प्रभाव; वाचा तिची यशोगाथा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) चा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातून ठाण्याची २७ वर्षीय कश्मिरा संखे पहिली आणि देशात २५वी आली आहे. कश्मिरा संखेचा (Kashmira Sankhe) महाराष्ट्र यूपीएससी टॉपर होण्याचा प्रवास काही कमी प्रेरणादायी नाही.

महाराष्ट्रातील एका छोट्या गावात जन्मलेली आणि वाढलेली कश्मिरा नेहमीच हुशार आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनी होती. लहानपणापासूनच, तिला शिकण्याची तीव्र आवड निर्माण झाली आणि तिने समाजात बदल घडवण्याचे स्वप्न पाहिले. कश्मिराच्या पालकांनी, जरी स्वतः उच्चशिक्षित नसले तरी, त्यांच्या मुलीची क्षमता ओळखली आणि तिला शक्य तितक्या प्रकारे पाठिंबा दिला. त्यांनी तिला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले आणि तिला शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान केली. आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही त्यांनी तिला दर्जेदार शिक्षण मिळावे याची खात्री केली.

कश्मिरा संखे हीनं निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “खूप काही अपेक्षा मी ठेवल्या नव्हत्या. पण आशा होती आणि सकारात्मकता ठेवली होती की यावेळी नक्कीच यश मिळवायचं आहे. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा फिलिंग होत होतं की, चांगला रँक येईल. तरी देखील ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे का रँकर लिस्ट आहे हे तपासून पाहिलं. पण ही रँकर लिस्ट असल्यानं त्यात माझा ऑल इंडिया २५ वा रँक आला”

लहानपणापासून युपीएससी करण्याचं माझं स्वप्न होतं. कारण किरण बेदींचा प्रभाव माझ्या आईवर होता, त्यामुळं तिनं मला त्यांची पुस्तकं वाचायला दिली. तेव्हापासून मला वाटतं होतं की आपण युपीएससी करुयात. माझं शालेय शिक्षण आणि पदवी हे मुंबईतून झालं. डेन्टल सर्जरीमध्ये मी पदवी घेतली आहे. हे करताना मी लोकांच्या आरोग्यासाठी काम करत होते, पण सिव्हिल सेवेत येऊन जास्त मोठ्या स्केलवर काम करता येईल, असं मला वाटलं त्यामुळं युपीएससी केली.

मानववंशशास्त्र हा विषय तीनं ऑप्शनचा विषय म्हणून घेतला होता. या तिसऱ्या प्रयत्नात ती युपीएससी पास झाली आहे. तिचा पहिलं प्राधान्य आयएएससाठी होतं तर दुसरं प्राधान्य आयएफएससाठी होतं. पण चांगली रँक आल्यानं आता आयएएस होण्याचं तीचं स्वप्न पूर्ण होणार आहे.