पुणे हादरलं : कॉंग्रेस नेते विकास टिंगरेंनी कार्यालयातच संपवलं आयुष्य; राजकीय वर्तुळात खळबळ 

Pune Suicide : पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी आत्महत्या केली आहे. (Vikas Tingre committed suicide.) त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.विकास टिंगरे हे पुणे शहरातील विश्रांतवाडी भागाचे काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष होते. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयातच त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अजुनही  समोर आलेलं नाही आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास टिंगरे हे मंगळवारी रोजच्या प्रमाणे धानोरी येथील पोरवाल रोडवर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात आले होते.  विकास यांनी मंगळवारी जेवण केलं नव्हतं. त्यामुळे त्यांचे कर्मचारी त्यांना ऑफिसमध्ये बघायला गेले होते. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना विकास टिंगरे यांनी गळफास घेतल्याचं दिसलं.

यानंतर त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टिंगरे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.