पंतप्रधानांच्या सुरक्षा भंगाच्या कटामागे काँग्रेस हायकमांडचा हात ?

चंडीगड –  पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्याच्या दौऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टींची माहिती पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना दिली होती, या त्यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष ( भाजप ) चे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी रविवारी चन्नी यांच्यावर टीका केली आहे.

चुग यांनी म्हटले की घटनात्मक पदावर असणारी व्यक्ती पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा उल्लंघनावर अधिकार नसलेल्या व्यक्तीला अहवाल देत आहे हे दुर्दैवी आहे.चन्नी यांना निर्लज्ज व्यक्ती म्हणत चुग म्हणाले,  त्यांनी पंतप्रधानांना पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर शत्रूच्या रणगाड्यांच्या कक्षेत उभे केले. परंतु चन्नी यांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असे ते म्हणाले.

मला आश्चर्य वाटते की ते प्रियंका गांधीजींना रिपोर्ट करत आहेत. मला चन्नी साहेबांना विचारायचे आहे… प्रियंका गांधीजी कोण आहेत… त्या कोणत्या घटनात्मक पदावर आहेत? एक मुख्यमंत्री म्हणत आहेत की त्यांनी प्रियंका गांधींना संबंधित लोकांबद्दल माहिती दिली आहे. षड्यंत्रात  मुख्यमंत्र्यांच्या या विचित्र प्रशासकीय वर्तनावर टीका करताना भाजप नेते म्हणाले. पंतप्रधानांच्या सुरक्षा भंगाच्या कटामागे काँग्रेस हायकमांडचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला .

संवैधानिक पदावर असणारी व्यक्ती अधिकार नसलेल्या व्यक्तीला रिपोर्ट करत आहे हे दुर्दैवी आहे. काँग्रेस सुरुवातीपासूनच संवैधानिक पदांचा अपमान करत आहे,” असेही ते पुढे म्हणाले.