योगींच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरवर होतेय कडक कारवाई; महाराष्ट्रात कधी होणार ?

लखनौ – महाराष्ट्रात ( Maharashtra ) लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता यूपीमधून ( UP ) एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे पोलिसांनी अनेक लाऊडस्पीकर ( Loudspeaker ) आणि पीए म्युझिक सिस्टीमवर ( PA Music System ) कारवाई केली आहे. यूपीचे एडीजी प्रशांत कुमार ( ADG Prashant Kumar ) यांनी ही माहिती दिली आहे.

या कारवाईची माहिती देताना एडीजी म्हणाले की, लाऊडस्पीकरबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. आम्ही शेकडो लाऊडस्पीकर आणले आहेत आणि कारवाई सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath ) यांनी कडक याबाबत कडक पावले उचलण्यास सांगितल्यानंतर यूपीमध्ये साऊंड सिस्टम आणि लाऊडस्पीकरबाबत कारवाई सुरू झाली आहे.

याआधी सीएम योगींनी लाऊडस्पीकर आणि माइकबाबतही आदेश जारी केला होता . ज्यात त्यांनी म्हटलं होतं की, यासाठी आधी परवानगी घ्यावी लागेल आणि जे परवानगी घेत आहेत, त्यांचा आवाज त्या आवारातून बाहेर येत कामा नये. लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे इतर लोकांची गैरसोय होऊ नये, असे सीएम योगी म्हणाले होते. आता नवीन ठिकाणी लाऊडस्पीकर किंवा माइक लावण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही सांगण्यात आले.