… असे पळपुटे छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक होऊच शकत नाहीत; नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेची टीका

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राज्यकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील राजकीय उलाथापालथीला प्रचंड वेग आला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत अपेक्षेप्रमाणे नामांतराचा मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता (Approval to name Aurangabad city as ‘Sambhajinagar’ and Osmanabad city as ‘Dharashiv’) देण्यात आली आहे.

याचबरोबर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास देखील मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावर आता प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

ते म्हणाले, सरकार बहूमतात असताना औरंगाबाद आणि उस्मानाबादच नामकरण केल नाही… आता अल्पमतात जातय तेव्हा ठराव मंजुर करून पळ काढायचा म्हणजे जबाबदारी नविन सरकारवर… असे पळपुटे छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) पाईक होऊच शकत नाहीत.असं चिले यांनी म्हटले आहे.