भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टानेही दिला दणका

सातारा – मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे (forged documents) तयार केल्याचे प्रकरण भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या (BJP MLA Jaykumar Gore) चांगलेच अंगाशी आले. या प्रकरणी गोरेंविरोधात गुन्हा दाखल (FIR) आहे. यातच आता जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळला आहे. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Krishna Murari, Chief Justice N.V. Ramanna and Justice Hima Kohli) यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

कोर्टासमोर येऊन रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने गोरे यांना दिले आहेत. यापूर्वी गोरे यांना वडूज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई हायकोर्टात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मात्र त्यांना कुठेच दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात दाद मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

दरम्यान,  मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे , महेश पोपट बोराटे (MLA Jayakumar Gore, Dattatraya Kondiba Ghutugade, Mahesh Popat Borate) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.